१) लाभार्थीचे कुटुंब महाराष्ट्र राज्याचे रहिवाशी असणे आवश्यक राहील.
२) अर्जदाराचे वय २० ते ४० वर्षे दरम्यान असणे अनिवार्य आहे.
३) सदर योजनेअंतर्गत लाभ घेण्यासाठी अर्ज करणाऱ्या लाभार्थ्यांचे बैंक खाते असणे आवश्यक आहे.
४) लाभार्थी कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न रक्कम रु.३.०० लाखापेक्षा जास्त नसावे.
५) लाभार्थ्यांकडे वाहन चालक परवाना असणे आवश्यक राहील.
६) विधवा, कायद्याने घटस्फोटीत, राज्यगृहामधील इच्छुक प्रवेशित, अनाथ प्रमाणपत्र प्राप्त युवती, अनुरक्षणगृह/बालगृहातील आजी/माजी प्रवेशित यांना प्राधान्य देण्यात येईल.
७) तसेच दारिद्र्य रेषेखालील महिलांना सुध्दा प्राधान्य देण्यात येईल.